आचरा : राखीच्या बंधनातून दिला सुरक्षित प्रवासाचा संदेश

शेअर करा

आचरा पोलिसांचा ‘सुरक्षा राखी’ अभिनव उपक्रम; आचरा तिठ्यावर वाहनचालकांमध्ये जनजागृती

आचरा,दि.२८ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)

रक्षाबंधन म्हणजे पवित्र बंधन या बंधनाची रस्ते सुरक्षेला जोड देत सिंधुदुर्ग पोलीस दलाने सुरक्षा राखी’ हा अभिनव उपक्रम पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याचा संदेश देत आचरा पोलीसांनी वाहनचालकांच्या मनात सुरक्षिततेची जाणीव निर्माण केली. रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस भगिनींनी बांधलेली ही ‘सुरक्षा राखी’ वाहनचालकांसाठी सुरक्षित प्रवासाची जाणीव करून देणारी ठरली.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा तिठा येथे आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या उपस्थितीत हे जनजागृती अभियान राबविण्यात आले.यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ,वाहतूक पोलीस मिलिंद परब, विशाल वैजल, श्रीनाथ जाधव, पांडूरंग पारधी, तन्वी माणगावकर,अमित हळदणकर तसेच अन्य पोलीस कर्मचारी, यांसह मांगिरीष सांबारी,विजय कदम सिद्धार्थ कोळगे,तसेच
रिक्षा संघटना पदाधिकारी , होमगार्ड आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.सर्व वाहनचालकांना विनंती आहे की त्यांनी हेल्मेट घालून प्रवास करावा आपल्या घरी आपली बहिण नातेवाईक वाट बघत आहेत.सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट आवश्यक आहे.यावेळी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या मोटरसायकल स्वारांना आचरा पोलीसांनी राखी बांधून हेल्मेट वापरण्याची जाणीव करून दिली.

शेअर करा