दोडामार्ग: जंगमहट्टीतील १७ वर्षीय युवकाच्या अपहरण-हत्येचा छडा; तिघांना अटक

शेअर करा

हर्षद हुंदळेकरचा मृतदेह दरीत आढळला; चंदगड पोलिसांची जलद कारवाई, तिघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल

दोडामार्ग, दि.०२ सप्टेंबर

चंदगड तालुक्यात जंगमहट्टी गावातील युवक हर्षद प्रकाश हुंदळेकर वय वर्षे १७ याचे अपहरण करून मृतदेह तिलारीनगर पासून जवळ असलेल्या स्वप्नवेल नजीकच्या दरीत टाकून दिल्याचे उघडकीस आल्यानंतर चंदगड पोलिसांनी जलत गतीने तपास
गुन्ह्यातील संशयित आरोपी 1. कीर्ती कुमार रामू कुठरे वय 28 वर्षे 2. दिलीप लक्ष्मण कुटरे 29 वर्षे 3. श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर वय 24 वर्षे सर्व राहणार जंगम हट्टी तालुका चंदगड यांना आज अटक
करण्यात आली. अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक पोवार अधिक तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी युवकाची आई योगिता प्रकाश हुंदळेकर हिने चंदगड पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे वेगळया कारणासाठी अपहरण केले अशी फिर्याद दिली होती.
चंदगड पोलीस हर्षद प्रकाश हुंदळेकर या युवकाचा शोध घेत असताना त्याचा खून करून मृतदेह तिलारीनगर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वप्नवेल नजीकच्या दरीत टाकला अशी माहिती मिळाली होती यानंतर बुधवारी चंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
सोशल मीडियावर झालेली ओळख प्रत्यक्ष भेटीपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर 17 वर्षीय युवक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथे घडली होती. हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय 17) हा शनिवार रात्रीपासून बेपत्ता होता

शेअर करा