राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी स्थानकांतील प्रवाशांच्या समस्या सोडवा ; कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांकडे प्रमोद जठार यांची मागणी
सिंधुदुर्ग,दि.०२ नोव्हेंबर
कोकण रेल्वेमार्गावरील राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच या स्थानकांवरील प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
कोकण रेल्वेमार्गावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर अपेक्षित एक्सप्रेस गाड्यांचे थांबे नसल्याने स्थानिक प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी परिसरातील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता या स्थानकांवर अधिकाधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची आवश्यकता असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.