Kankavli News:कलमठमध्ये गड-किल्ले बनविणे, आंगण रांगोळी स्पर्धा

शेअर करा

कलमठ ग्रामपंचायतीतर्फे ८ नोव्हेंबरला आयोजन

कणकवली ,दि.०१ नोव्हेंबर

दीपावलीनिमित्त कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी कलमठ गाव मर्यादित गड-किल्ले बनविणे, आंगण रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंगण रांगोळी स्पर्धेकरिता अनुक्रमे २ हजार रु., दीड हजार रु., एक हजार रु., उत्तेजनार्थ ५०० रु. अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेकरिता नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी प्रियाली आचरेकर, स्वाती नारकर, तनिष्का लोकरे यांच्याकडे संपर्क साधावा. गड-किल्ले बनविणे स्पर्धेकरिता अनुक्रमे ३ हजार रु., २ हजार रु., १ हजार रु., उत्तेजनार्थ ५०० रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, सचिन खोचरे यांच्याकडे संपर्क साधावा. दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले आहे

शेअर करा