Talere News:कासार्डे विद्यालयाच्या कराटेपटूंची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी!

शेअर करा

नऊ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

तळेरे ,दि.०१ नोव्हेंबर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यालयाच्या एकूण 18 खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.त्यापैकी 9 खेळाडूंनी विजेतेपद पटकावत रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुलांच्या गटातील यश
14वर्षाखालील मुलांच्या गटात- निरज रमेश पवार याने (३५ किलो) वजनगटात -प्रथम, तर अद्वैत हनुमंत गीते (६० किलो) आणि ओम प्रदीप ठुकरूल (६० किलोवरील) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील गटात
ध्रुव अभिजीत शेट्ये (३५ किलो) याने -प्रथम, आदर्श दीपक जाधव (४५ किलो) व हर्षल योगेश कदम (४५ किलो) यांनी- तृतीय, तर अमोल दीपक जाधव (५० किलो) याने -प्रथम क्रमांक पटकावला.
१९ वर्षांखालील गटात शुभम सुरेश राठोड (५० किलो) आणि विघ्नेश संतोष पेडणेकर (८८ किलोवरील) यांनी- प्रथम, तर दुर्वास संजय पवार (५४ किलो) याने द्वितीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटातील यश :
१४ वर्षांखालील गटात अनामिका विजय कदम (२२ किलो) हिने -प्रथम, स्वरा विनायक देसाई (२२ किलो) हिने- द्वितीय, भार्गवी गणेश केतकर (३४ किलो) हिने -तृतीय, तर स्वरा नारायण झोरे (३४ किलो) हिने- प्रथम क्रमांक मिळविला. दक्षा संतोष राऊत (५० किलो) हिने -तृतीय क्रमांक पटकावला.
-१७ वर्षांखालील मुलींच्या गटात -वीरा दयानंद राणे (३२ किलो) हिने- प्रथम क्रमांक मिळविला.

१९ वर्षांखालील गटात- गौरी रवींद्र म्हस्के (३२ किलो) हिने- प्रथम, तर मनस्वी तुकाराम कोकरे (४८ किलो) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, प्रशिक्षक अभिजित शेट्ये व साईप्रसाद बिजीतकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच देवेंद्र देवरुखकर व विनायक पाताडे यांचे सहकार्य मिळाले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ. बी. बी. बिसुरे, प्रभारी मुख्याध्यापक ए. पी. घुले, ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. आर. सरवणकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेअर करा