देवगड : चाफेड-साखरवाडी बसस्टॉपचे उद्घाटन उत्साहात

शेअर करा

देवगड,दि.३१ मे

देवगड तालुक्यातील चाफेड-साखरवाडी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्टॉपचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गावचे सरपंच साहिल पांचाळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्टॉपमुळे प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल हवामानातही सुरक्षित व सोयीस्कर थांबा उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शेअर करा