Devgad : देवगड हायस्कूलमध्ये आजी- आजोबा सन्मान दिन संपन्न

शेअर करा

देवगड,दि.०७ ऑक्टोंबर


देवगड येथील शेठ म.ग हायस्कूल मध्ये आजी- आजोबा संबंधित संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रविण खडपकर, श्री. किशोर कुळकर्णी, सहाय्यक शिक्षिका अमृता किरकिरे आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित आजी आजोबांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून त्यांना ओवाळण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबा बद्दल ची मनोगते व्यक्त केली. तसेच उपस्थित आजी आजोबांनी देखील उपक्रमाचे कौतुक करा कुटुंबातील आजी-आजोबांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक श्री प्रविण खडपकर यांनी आजी आजोबांच्या सन्मानदिनाचे महत्त्व विशद केले. कुटुंबातील आजी-आजोबांची महत्त्वाची असणारी भूमिका त्यांचे महत्त्व कथन केले.
यावेळी सहाय्यक शिक्षिका अमृता किरकिरे यांनी आजी-आजोबांचे महत्त्व सांगणाऱ्या श्लोकाचे विद्यार्थ्यांकडून पठण करून घेतले. कार्यक्रमाचे निवेदन व आभार अमृता किरकरे यांनी केले.

शेअर करा