शेठ म. ग. हायस्कूल येथे विविध क्रीडा स्पर्धा; तालुक्यातील शाळांमधील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
देवगड,दि.१४ ऑक्टोंबर
शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचे सामने व विविध क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.
दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धांचे उद्घाटन शेठ म. ग. हायस्कूल, देवगडचे शाळा समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण खडपकर, तालुका क्रीडा समन्वयक श्री. आकाश पारकर आणि माजी तालुका समन्वयक उत्तरेश्वर लाड सर ज्येष्ठ शिक्षक श्री. फणसेकर सर उपस्थित होते.
याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती आणि संघभावना विकसित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी देवगड तालुका क्रीडा समन्वयक श्री. आकाश पारकर, क्रीडा शिक्षक श्री. सुरेश पवार, श्री. ज्ञानेश्वर कुंभरे, श्री. अरविंद धुर्वे, श्री. अजित कदम, श्री. रुपेश बांदेकर तसेच देवगड तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. ढेरे सर यांनी केले. सर्वांच्या सहकार्यामुळे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचा दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.