कणकवली,दि.२६ऑक्टोंबर
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाचीवाडी येथील शांताराम लाडोजी मेस्त्री यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे शांताराम मेस्त्री १०१ वर्षांचे होते. गेल्या वर्षी त्यांचा १०० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.त्यांच्या पश्चात ८ विवाहित मुलगे ,१ विवाहित मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.