Kankavli : कणकवली उपतालुका प्रमुख पदी सचिन लोके , कळसुली उपविभाग प्रमुख पदी नंदकिशोर परब यांची नियुक्ती

शेअर करा

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली तालुक्यात शिवसेनेच्या विविध पदांवर नव्या नियुक्त्या

कणकवली,दि.१४ ऑक्टोंबर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कणकवली तालुक्यातील विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नांदगाव पंचायत समिती उपविभाग प्रमुखपदी सुरेश सुतार, कासार्डे विभागाच्या उपतालुका प्रमुखपदी सचिन लोके आणि कळसुली पंचायत समिती उपविभागप्रमुखपदी श नंदकिशोर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक आणि विधानसभा प्रमुख , उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी नगरसेवक संकेत नाईक,तालुकाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके,माधवी दळवी,शोभा हुले, बबली राणे, बाळा राऊत, मज्जित बटवाले, संदीप कदम, चेतन हुले, तात्या निकम, रवींद्र खंदारे, विलास गुडेकर, ताम्हाणेकर, गुरु पेडणेकर,सुरेश मेस्त्री, नंदकिशोर परब, रोहिणी पिळणकर, दिव्या साळगावकर, राजू राणे,
रोहित राणे, निलेश सावंत, संतोष गुरव, राजा म्हसकर, विठोबा हुले आधी उपस्थित होते.

शेअर करा