कणकवली : सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट

शेअर करा

कणकवली, दि.३० मे

कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांची ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (भाजी मार्केट) यांच्या मागणीनुसार नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आधुनिक व सुसज्ज व्यापारी संकुल उभारण्याची आवश्यकता मांडली.

यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नवीन व्यापारी संकुल उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.

शेअर करा