कणकवली : तळेरे तालुका लढ्याला लवकरच यश मिळणार – अनुराधा नारक

शेअर करा

तळेरे तालुका निर्मिती कृती समिती आयोजित मेळावा

कणकवली,दि.२९ ऑगस्ट

कणकवली, वैभववाडी आणि देवगड अशा तीनही तालुक्यांना जोडणारे आणि राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले तळेरे हा गाव आहे. तळेरे तालुका होणारच, हे या चळवळीला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरु आहे.आपल्या या लढ्याला लवकरच यश मिळणार आहे,असा विश्वास जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी व्यक्त केला.

कासार्डे येथील स्मित लाँन्स येथे शनिवारी आयोजित केलेल्या नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समिती आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन अनुराधा नारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि.प.सदस्य प्राची इस्वलकर, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सहदेव खाडये, समृद्धी चव्हाण, सादिक डोंगरकर, माजी बांधकाम सभापती रविंद्र जठार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, सुधीर नकाशे, माजी सभापती संतोष कानडे, प्रकाश पारकर, बाप्पी मांजरेकर,बंड्या मांजरेकर, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, देवगड मंडल अध्यक्ष महेश नारकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समिती अध्यक्ष राजू जठार, मुंबई अध्यक्ष सुर्यकांत तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, सरपंच हनुमंत तळेकर, ॲड. प्रसाद करंदीकर, अशोक तळेकर यांच्यासह कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात उंचावून आणि “तळेरे तालुका झालाच पाहिजे” अशा घोषणा देत नियोजित तळेरे तालुका निर्मितीच्या मागणीला समर्थन दर्शविले. तसेच, महामेळाव्यात तळेरे तालुका झालाच पाहिजे यासाठी ठराव घेण्यात आला, त्यालाही सर्वांनी एकमुखाने समर्थन दिले.

डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले,नवीन तालुका निर्मितीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत,त्यात सर्वात प्रथम तालुक्याला जायला 40 किमीपेक्षा जास्त अंतर लागू नये. आपल्या कार्यक्षेत्रात येणारी गावे त्याहीपेक्षा खूप कमी अंतरावर आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी 11 इमारती लागतात, त्यासाठी तळेरे येथे दातृत्व आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्या आणि आजुबाजूच्या गावांचा सहभाग आवश्यक आहे, असे सर्व निकष पूर्ण करत असून पालकमंत्री नितेश राणे यांना विनंती करणार आहोत की, तळेरे तालुक्याचे निर्माते तुम्ही व्हावे.

यावेळी बोलताना हर्षदा वाळके म्हणाल्या , भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर असेल तर विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. देवगड तालुक्यातील तळेरे लगतच्या गावातील लोकांना किंवा अगदी शासकीय कर्मचाऱ्यांना तालुक्याला जायचे म्हणजे पाहिले तळेरे नंतर नांदगाव आणि त्यानंतर देवगड असा प्रवास करावा लागतो. त्यामुळे तळेरे तालुका हा सर्वांनाच सोयीचा, सुलभ आणि मध्यवर्ती असा होऊ शकेल.

यावेळी प्रकाश पारकर, सादिक डोंगरकर, रवींद्र जठार, प्राची इस्वलकर, संतोष कानडे, ॲड. प्रसाद करंदीकर, अशोक तळेकर, सुभाष उरणकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, हर्षदा वाळके यांनी मनोगत व्यक्त केले.

मेळाव्याच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत आणि शेवट संपूर्ण वंदे मातरम् ने करण्यात आली. या मेळाव्याला नियोजित तळेरे तालुक्यामध्ये येणाऱ्या गावांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन राजेश जाधव, प्रास्ताविक राजू जठार, आभार दिलीप तळेकर यांनी मानले.

शेअर करा