कणकवली न्यायालयात मंत्री नितेश राणे यांची हजेरी ; जनतेच्या हितासाठी काही केसेस आमच्यावर…
कणकवली,दि.२३ जुलै
जनतेच्या प्रश्नासाठी लढत असतानाच्या केसमध्ये न्यायालयाने आदेश दिले होते. त्याप्रमाणे मी कणकवली न्यायालयात हजर राहिलो. माझ्यासोबत आ. प्रमोद जठार व सहकारी देखील आज दाखल झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या भवितव्याची काळजी आहे. त्यामुळेच जनतेने त्यांना पंतप्रधान पदावर बसवलेले आहे. म्हणून पंतप्रधांनी केलेले ट्विट अतिशय योग्य आहे. त्याचा बोध देशातील तरुणांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथील न्यायालयात हजेरी लावत तेथील जनतेशी संवाद साधला.यावेळी आ.प्रमोद जठार, मिलींद मेस्त्री, प्रज्ञा ढवळ, राजश्री धुमाळे, ॲंड.राजेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते.
जे नीट परिक्षा संदर्भात आंदोलन चालु आहे, त्याबाबत परिक्षाप्रक्रियेमध्ये सुधार झालाच पाहिजे. परंतु केंद्रसरकार व सर्वच मंत्री म्हणत आहेत की, परिक्षेमध्ये सुधार झालाच पाहिजे. त्यादृष्टीने पाऊले उचचली जात आहेत. नीट चा निकाल लागून 11 लाख विद्यार्थी पास झालेले आहेत. एका बाजुला नीटचा मुद्दा असताना दुसरीकडे आंदोलनकर्ते आंदोलन करत असताना सर तण से जुदा … चे नारे का देत आहेत ? , देश विरोधी नारे का देत आहेत? हिंदू धर्माची बदनामी का करत आहेत ?आमच्या सैनिकांवर आरोप कशाला करता? आमच्या पोलीस दलांवर कशाला हात घालतात? हे सगळं करणारे विद्यार्थी कधीच असू शकणार नाही. आमचा तरुण विद्यार्थी हा हिंदू राष्ट्रावर विश्वास ठेवणारा आहे. हिंदू राष्ट्राविरुध्द असणा-या ज्या शक्ती आहेत,त्या या आंदोलनात सहभागी होवून केंद्र सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला.
कॉग्रेस या शक्तीला ताकद देत आहे त्यांना पाठीशी घालत आहे. देशहिताच्या राहूल गांधी यांच्या तोंडी शोभत नाही. म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं आहे. वारंवार कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपल्या राजकीय उंचीप्रमाणे पंतप्रधानांवर टीका करावी. तसेच कॉंग्रेसच्या काळात नीटचा पेपर कितीवेळा फुटला ? त्यावेळी पंतप्रधानांचा राजीनामा घेतला का? कितीवेळी त्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. आंदोलनकर्त्यांच्या खांद्यावर बसून कोण जर देश विरोधी भूमिका घेत असेल तर ती चुकीची आहे. महाराष्ट्र बंद मध्ये कुणीच सहभागी झाले नाही.आमच्या देशाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होणार नाही , याची काळजी पंतप्रधान घेत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.