Sawantwadi : मोती तलावात ड्रेनेजचे पाणी; सहा महिन्यांपासून तक्रारींकडे दुर्लक्ष – संजू परब

शेअर करा

मोती तलावाचे अस्तित्व धोक्यात; ड्रेनेजचे पाणी तत्काळ बंद करण्याची माजी नगराध्यक्षांची मागणी

सावंतवाडी,दि.१९ ऑक्टोंबर

मोती तलाव हा शेवटच्या घटका मोजतोय. गेले सहा महिने आम्ही नगरपालिकेत ही बाब ओरडून सांगतोय. प्रशासनाला पत्रही दिल मात्र, सत्ताधारी आणि प्रशासनाच दुर्लक्ष याकडे होत असल्याचा टोला माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी हाणला. मोती तलावात येणार ड्रेनेजचं पाणी बंद कराव असंही त्यांनी म्हटल आहे.

श्री. परब म्हणाले, प्रत्येक वेळी नोटीसा दिल्यात असं उत्तर आम्हाला मिळत. वीस वर्षांपूर्वी मोती तलावात पोहण्याच्या स्पर्धा घेत होते, यासाठी लोक येत होते. पण, आज मोती तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. याकडे न.प. आरोग्य विभागाच लक्ष नाहीये. आरोग्य विभाग यासाठी कमी पडलेला दिसतो. रामेश्वर प्लाझाचं ड्रेनेजच पाणी, सालईवाडा येथील काही बिल्डिंगच पाणी तलावात सोडले जात. मात्र, केवळ नोटिसा दिल्याचे प्रशासध सांगत. मिलाग्रीस शाळेकडून येणाऱ्या ओहोळाची घाण तलावात येते. याबाबत लक्ष वेधूनही सत्ताधारी आणि प्रशासन या दोघांचंही दुर्लक्ष होत आहे. मोती तलाव वाचवण्यासाठी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री नितेश राणे यांना मी साकडं घालणार आहे. तलावाचं पाणी कसं स्वच्छ होईल याकडे मी लक्ष देणार असल्याच त्यांनी नमूद केले आहे.

शेअर करा