.”सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार” देवगड मिठमुंबरी गावचे प्रा. डॉ. राजेंद्र आत्माराम मुंबरकर यांना प्रदान;२५५ गुणवंत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान
तळेरे,दि.२६ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४८ वा वार्षिक कौटुंबिक मेळावा स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती भवन निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाला. यावेळी “सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार” देवगड मिठमुंबरी गावचे प्रा. डॉ. राजेंद्र आत्माराम मुंबरकर यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर लहानथोर सभासद कलाकारांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर नाट्यसिंधू विभागाच्या वतीने सादर केलेल्या “येवा कोंकण आपलाच आसा” या विनोदी एकांकिकेने सर्वांचे मनोरंजन केले.
त्यानंतर पहिली ते पदवीधर तसेच कला क्रिडा सामाजिक क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या २५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, सामाजिक क्षेत्रात व मंडळासाठी योगदान दिलेल्या वसंत वारंग, पद्माकर पाटील, प्रशांत परब या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना २०२६ सालचा “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी मंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा “सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार” देवगड (मिठमुंबरी) गावचे प्रा. डॉ. राजेंद्र आत्माराम मुंबरकर यांना पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौर शर्मिलीताई बाबर, शिवसेना नेत्या सौ सुलभाताई उबाळे, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती भवनचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. (शाल, श्रीफळ, मानपत्र व 11 हजार रुपये रोख) यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक प्रमोद राणे, सल्लागार अंकुश साईल, परशुराम प्रभू, मंडळाचे पदाधिकारी एड. चंद्रकांत गायकवाड, धर्मराज सावंत, अरुण दळवी, विश्वास राणे, प्रकाश साईल, चंद्रकांत साळसकर तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्ग वासिय उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमने झाली तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.
पराग पालकर, विश्वास राणे, संजय सावंत, नंदकिशोर सावंत, आनंद साटलकर, महादेव बागवे, बाळा गुरव, अभय नरडवेकर, योगेश घाडी, प्रकाश परब, दीपक राणे, विष्णू भुते, शंकर दळवी, प्रदीप कोरगावकर, संतोष गावडे, सुरेश वेंगुर्लेकर, विजय अहिरे, संतोष गायकवाड, नरेंद्र धुरी, सुनिल गायकवाड, यशवंत गावडे, रुपेश काणेकर, नरेंद्र धुरी, भुषण राणे, प्रदिप कोरगावकर, शंकर दळवी, पुंडलिक गावडे, अधिरज मुळीक, अनिल सावंत, नागेश उद्धव, राजेश कांडर, अशोक राणे, राजेंद्र गवस, जगदिश चिपकर, विद्या मेस्त्री, भूमिका सावंत, शीतल परब… यासोबत इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष साटम,प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले तर शेवटी आभार अभय नरडवेकर यांनी मानले.