आरोग्य सभापती सौ पूनम चव्हाण यांचा घणाघात
मालवण,दि.१५ ऑगस्ट
ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर उपोषण करत असताना त्यांनी तयार केलेले एआय व्हिडीओ है पूर्णपणे दिशाभुल करणारे आणि त्यांचेच तत्कालीन आमदार वैभव नाईक यांचे अपयश दाखवून देण्याचाच प्रयत्न आहे, असा घणाघात मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ पूनम चव्हाण यांनी केला आहे.
गेले काही दिवस मालवण शहरातीलआरोग्य विषयक व विविध समस्याबाबत ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी झोड उठवीत 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सभापती सौ पूनम चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्यावर पलटवार केला आहे यावेळी त्यांच्या सोबत नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर हेही उपस्थित होते
पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी तपस्वी मयेकर यांच्या मातोश्रीही नगरसेविका होत्या त्यांनी त्यावेळी आपल्या आमदारांना प्रश्न विचारण्याचे धाडस का केले नाही? असाही सवाल उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या पाच वर्षांपूर्वी मालवण शहरात कचऱ्याचे ढीग कसे असायचे आणि आज ते कशा पद्धतीने कमी झाले आहे हे आम्ही सांगण्याऐवजी मालवणची जनता सांगत आहे कचरा ही अशी गोष्ट आहे की ती सातत्याने होत असते त्यामुळे लोकप्रतिनिधीने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माझ्या प्रभागात कचरा होता कामा नये यासाठी जनजागृती केली पाहिजे, ते त्यांचे पहिले पाऊल असले पाहिजे मयेकर यांनी आपल्या प्रभागातील जनतेने रस्त्यावर कचरा टाकता नये यासाठी काय उपाययोजना केली ही त्यांचीही जबाबदारी आहे आम्ही आमच्या प्रभागात कचरा कमी केल्याचे सौ चव्हाण म्हणाल्या
तपस्वी मयेकर यांनी कचरा बिल खोटी निघतात असा आरोप केला आहे यावर बोलताना सौ चव्हाण यांनी म्हटले आहे की घनकचरा अधिनियम 2016 च्या अधिनियमानुसार ज्या काही अटी व शर्ती आहेत त्याप्रमाणे ते अंदाजपत्रक तयार केले गेले होते त्या अंदाजपत्रकात घरोघरी कचरा संकलन ही नमूद केलेली गोष्ट आहे परंतु घनकचरा अधिनियमात 2016 मध्ये हेही सांगितले आहे की घरोघरी म्हणजे नगरपालिकेने जो दहा-पंधरा घरांसाठी एरिया दिला आहे त्या ठिकाणी न प ची गाडी जाणार त्या ठिकाणी तो कचरा नागरिकांनी आणून दिला पाहिजे
नगरपालिका क्षेत्रात दहा ते पंधरा हजार घरे असतील तर घरोघरी जाऊन, दरवाजा ठोठावून कचरा आणायचा नाही आहे त्यांनी अधिनियमात असे म्हटले आहे की प्रत्येक एरियात जो नगरपालिकेने पॉईंट ठरवून दिला आहे त्या ठिकाणी जाऊन कचरा उचल करायचे आहे आपण सभापती झाल्यापासून नगरपालिकेच्या सर्व गाड्यांचे स्कॅनिंग केले जात आहे. ९७.४७ टक्के स्कॅनिंग केले जात आहे. विरोधी लोकप्रतिनिधींनी सहकार्याच्या भूमीकेतून शहरातील जनतेला आवाहन करून नगरपालिकेची गाडी आल्यानंतर त्यामध्ये कचरा टाकण्यात आला तर कचऱ्याचे ढीग दिसून येणार नाही. विरोधकांना फक्त स्टंटबाजी करायची आहे. यामुळे त्यांनी सर्वप्रथम शहराची बदनामी थांबवावी, असेही सौ चव्हाण म्हणाल्या.