आर्थिक मदतीसाठी अर्ज नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध; पात्र दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन!
वेंगुर्ला,दि.२७ऑक्टोंबर
शहरातील दिव्यांग लाभाथ्र्यांना आर्थिक सहाय्य मिळण्याचे अर्ज वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध असून संबंधितांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दरवर्षी 5 टक्के रक्कम दिव्यांग लाभाथ्र्यांना आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येते. यासाठीचे अर्ज वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये उपलब्ध आहेत. नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग लाभाथ्र्यांनी आपले आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआय कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक यांची झेरॉक्स प्रत तसेच दोन पासपोर्ट फोटोसहीत 30 ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर करावेत. शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभाथ्र्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.