पहिल्याच दिवशी वह्या पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावण
आचरा,दि.१५ जून ( अर्जुन बापर्डेकर )
वर्षं नवे संकल्प नवे ज्ञान ज्योतीचे लक्ष थवे ज्ञान मंदिरी धावत या रे स्वागत करतो प्रेमभरे अशा भावना व्यक्त करत न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवेश करणा-या मुलांवर पुष्पवर्षाव करत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रवेश दारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
या कार्यक्रमाला स्थानिक स्कूल समितीचे जे एम फर्नांडिस , राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, उपमुख्याध्यापक मधुरा माणगांवकर

शिक्षक,प्रकाश महाभोज, ,यांसह इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वपुस्तकांचे वाटप करण्यात आले.तसेच सौ वंदना जयंत देशपांडे,जयंत देशपांडे यांच्या कडून गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या २५सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना शालेय समिती अध्यक्ष फर्नांडिस यांनी ज्ञानदान करणा-या शिक्षकांवर विश्वास ठेवून विद्या ग्रहण केल्यास,शाळेची शिस्त पाळल्यास जीवनात यशस्वी होऊ शकता.कार्यक्रमाचे सुत्र संचलन मधुरा माणगावकर यांनी तर आभार साटविलकर सर यांनी मानले.