बांदा : पाडलोसमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

शेअर करा

बांदा , दि. २० जून
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, पाडलोस येथे पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, सामाजिक कार्यकर्ते रोहन सातार्डेकर, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, मदतनीस प्रचला पटेकर, पालक सायली सातार्डेकर तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापिका रश्मी आकेरकर यांनी शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. सध्या शाळेत एकाच शिक्षकावर सर्व शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी असून तालुका व केंद्रस्तरीय बैठका तसेच ऑनलाइन कामकाजामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याने अतिरिक्त शिक्षकाची तातडीने नियुक्ती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका रश्मी आकेरकर यांनी केले. शाळा मुख्यमंत्री वैभव नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर पाडलोस सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी आभार मानले.

शेअर करा