बांदा,दि.०२ ऑगस्ट
भाजप फार युथच्या वतीने आरोस-दांडेली येथील विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता.
यावेळी भाजप कार्यकर्ते अक्षय नाईक, युवा कार्यकर्ते श्रीधर नार्वेकर, माजी अध्यक्ष रुपेश मोरजकर, सार्थक नाईक, प्रज्योत मालवणकर, हरी नाईक, दीपक नाईक तसेच शिक्षक प्रतीक पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.