Banda : वक्तृत्व स्पर्धेत तन्वी मोरजकर प्रथम

शेअर करा

बांदा,दि.०६ ऑक्टोंबर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकता प्रभाग संघ, मळेवाड यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्या विहार इंग्लिश स्कूल, आरोसची पाचवीतील विद्यार्थिनी तन्वी रुपेश मोरजकर हिने लहान गटातून प्रथम क्रमांक पटकावला. तन्वीने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने परीक्षकांची दाद मिळवत यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश परब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तन्वीच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा मिळाला असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा