नवीन सॉफ्टवेअर प्रणालीत स्थलांतर; ग्राहकांनी व्यवहारांचे नियोजन करण्याचे डाक विभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग,दि.२७ऑक्टोंबर
डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सेवांसाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या McCamish या सॉफ्टवेअरचे नवीन Insurance Management Solution (IMS) प्रणालीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने रविवार, दि. १ नोव्हेंबर ते रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत PLI व RPLI सेवांसाठी ‘नो ट्रान्झॅक्शन डे’ घोषित करण्यात आला आहे.
या कालावधीत सर्व पोस्ट ऑफिसमधील काउंटरवर डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विम्याशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच, या सेवांशी संबंधित ऑनलाइन सुविधाही उपलब्ध राहणार नाहीत.
त्यामुळे PLI व RPLI पॉलिसीधारक आणि ग्राहकांनी आपल्या विमा पॉलिसींशी संबंधित आवश्यक आर्थिक व्यवहार १ नोव्हेंबरपूर्वी किंवा ८ नोव्हेंबरनंतर पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे