बांदा : गोगटे-वाळके महाविद्यालयात टिळक, अण्णाभाऊ साठे व प्रेमचंद यांना अभिवादन

शेअर करा

बांदा,दि.०२ ऑगस्ट
गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या स्मरणार्थ संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात तिन्ही साहित्यिक व राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
राज्यशास्त्र विभागाचे प्रा. पी. डी. कसबे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, साहित्यनिर्मिती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा, ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांद्वारे केलेल्या जनजागृतीचा आणि ‘गीतारहस्य’सह त्यांच्या साहित्यसंपदेचा आढावा घेतला. हिंदी विभागाचे प्रा. राजेंद्र पवार यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या जीवनकार्याची व ‘गोदान’ कादंबरीची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. डी. जी. जोशी होते. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र पवार यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. अभिजीत गटकुळ यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा