देवगड : रानभाज्यांची जाण असलेल्या शेतकऱ्यांची संघटना उभी राहावी : सभापती गणेश राणे

शेअर करा

रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रम राबविण्याचे आवाहन

देवगड,दि.२४ ऑगस्ट

रानभाज्याचे आयुर्वेदातील महत्त्व लक्षात घेऊन त्यांची उत्तम जाण असलेल्या शेतकऱ्यांची एक संघटना निर्माण झाली पाहिजे. अशा संघटना मार्फत तळागाळा पर्यंत उपक्रम राबवून शेतकऱ्यांचं हित व आर्थिक उन्नती साधली पाहिजे. असे ठोस प्रतिपादन सभापती गणेश राणे यांनी रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी केले


महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती देवगड ,उमेद अभियान , माविम देवगड ,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा समारंभ जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी सभापती गणेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोकेजिप सदस्य सुनील पारकर, देवदत्त कदम अवनी तेली प.स .सदस्य रवींद्र तिलोटकर सलोनी तळवडेकर, संजना आळवे , आत्म्याचे अध्यक्ष प्रसाद देवधर तहसीलदार शितल जाधव ,गटविकास अधिकारी निलेश जगताप विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील देवगड कृषि अधिकारी आरती पाटील , रान भाज्याचे अभ्यासक रामचंद्र शृंगारे पस चे कृषी अधिकारी श्री खराडे ,नारायण तिर्लोटकर ,उषाकला केळुस्कर आधी उपस्थित होते . प्रारंभी या प्रदर्शनाचे उद्घाटन सभापती गणेश राणे यांचे हस्ते फित कापून करण्यात आले.


रानभाज्यांचे रोजच्या आहारातील महत्व अधिक असून असे सांगून सभापती गणेश राणे पुढे म्हणाले, विद्यार्थांना या रानभाज्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे.त्यासाठी पोषण आहारात या भाज्यांचा समावेश झाला पाहिजे. देवगड पंचायत समिती कडे स्वतंत्र उपलब्ध असलेल्या जागेमध्ये बचत गटांना आठवडा बाजारात विक्री करण्यासाठी सुविधा निर्माण करून दिली जाईल. त्यादृष्टीने ध्येयधोरण राबवून रानभाज्या मध्ये तालुक्याचे नाव निश्चितपने उंचावले जाईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


उपसभापती अमोल लोके यांनी या प्रदर्शनात एकाच ठिकाणी सुमारे ४० प्रकारच्या रानभाज्या पाहता आल्या. या रानभाज्या पासून बचत गटातील महिलांनी ज्या पाककृती सादर केल्या. त्या निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. तहसिलदार शितल जाधव यांनी पंचायत समिती मार्फत नेहमीच नवनविन उपक्रम राबवले जातात. या प्रदर्शनातून रानभाज्यांचा हा ठेवा एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कडे गेला पाहिजे. त्यासाठी नात नातवा पासून त्याचे शिक्षण दिल्यास पुढील ४० वर्षे हा वारसा जिवंत राहील. असे आवाहन त्यांनी केले. प्रसाद देवधर यांनी रानभाज्यांचे सीड बँक करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आत्माच्या माध्यमातून गावागावात शेतकरी गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे स्पष्ट केले. तर जिप सदस्य सुनिल पारकर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा मधून स्थानिक पातळीवरील रानभाज्या व विद्यार्थांना पोषक ठरेल असाच आहार दिला पाहिजे. अशी आपली आग्रही मागणी राहील. व त्याचा पाठपुरावा केला जाईल असेही ते म्हणाले.


या प्रदर्शनात तालुक्यातील बचत गटामार्फत प्रदर्शन मांडण्यात येऊन त्यात देवगड परिसरातील सुमारे ४० रानभाज्यांचा समावेश होता. या रानभाज्या पासून ४५ बचत गटाणी पाककला सादर केल्या. त्यात प्रथम क्रमांक प्राची प्रकाश महाजन, द्वितीय क्रमांक साक्षी सूर्यकांत गुरव, तृतीय क्रमांक सुनिता जयप्रकाश पाटील तर उत्तेजनार्थ रश्मी रविंद्र कांदळगावकर, व प्रणाली प्रदीप कावले यांना मान्यवरांचे हस्ते भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत ४२ स्पर्धकांनी भाग घेतला. उर्वरीत स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रानभाज्यांचे अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांनी चित्रफित च्या माध्यमातून अनेक रानभाज्यांची ओळख करून देऊन सुमारे १५० रानभाज्या आपल्या परिसरात असून आयुर्वेदातील महत्त्व त्यांनी स्पष्ठ केले.

शेअर करा