कणकवली :राणेंचा कट्टर कार्यकर्ता म्हणून साईनाथ ओटवकर यांची ओळख – गोट्या सावंत

शेअर करा

एसटी महामंडळच्या सेवेतील निवृत्ती झाली, आता गावासाठी काम करा ; साईनाथ ओटवकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आयनल येथे कार्यक्रम

कणकवली,दि.१ सप्टेंबर

1990 पासून खा.नारायण राणे यांच्या सोबत आम्ही सर्वजण काम करत आहोत. त्यामध्ये साईनाथ ओटवकर यांची आम्हाला कायम साथ होती. नेहमी आयनल गाव आणि परिसरातील समस्या सोडवण्यासाठी त्यांची धडपड कायम होती. एसटी महामंडळात सेवा बजावत असल्याने त्यावेळी त्यांना मर्यादा पडत होत्या. मात्र, आता एसटी महामंडळाच्या सेवेतून तुम्ही निवृत्त झालात. त्यामुळे आता आयनल गावासह एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी खा.नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात काम करा. ख-या अर्थाने साईनाथ ओटवकर यांची राणेंचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख कायम असल्याचे कौतुगोद्गार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा नाटळ जिल्हा परिषद सदस्य गोट्या सावंत यांनी केले.


आयनल मणेरवाडी येथील गणेश मंदिरात साईनाथ ओटवकर यांच्या सेवा निवृत्तीपर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष गोटया सावंत यांच्या हस्ते साईनाथ ओटवकर यांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, आयनल सरपंच सिद्धी दहिबावकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर, उपसरपंच विलास हडकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण साटम, माजी सरपंच बापु फाटक, पत्रकार उत्तम सावंत, संदिप सावंत, आदेश ओटवकर, शत्रुघ्न डामरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
भगवान लोके म्हणाले, साईनाथ ओटवकर यांची आता एसटी महामंडळातुन सेवा निवृत्ती झाली आहे. सेवेत असताना सामाजिक काम करत असताना अनेक अडचणी येतात. परंतु आता आयनल गाव व समाजाचे प्रश्न घेवुन काम केले पाहीजे. त्यासाठी आपण सर्वजण एकजुट ठेवूयात.
सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले, साईनाथ ओटवकर यांच्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. 1990 च्या काळापासुन साईनाथ ओटवकरांनी खा. नारायण राणे यांच्यासाठी आमच्यासमवेत एकत्रित काम केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र काम करुयात.

खा. नारायण राणे यांचा कार्यकर्ता म्हणुन अभिमान- साईनाथ ओटवकर


मी जरी एसटी महामंडळात काम करत असताना सुरुवातीपासुनच सामाजिक , राजकीय जीवनात खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाला प्रेरीत झालो होतो. त्यामुळे अनेक अडचणी असताना खा. राणे यांची आम्हाला मदत झालेली आहे. पालकमंत्री नितेश राणे व गोटया सावंत यांनी देखील गावातील विविध प्रश्नांसाठी सहकार्य केले. त्यामुळे आता एसटी महामंडळातुन निवृत्त झालो असलो तरी सर्वांसोबत सामाजिक प्रश्न घेवुन काम करत राहु, असा विश्वास एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी साईनाथ ओटवकर सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत साईनाथ ओटवकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा