Dodamarg News : दोडामार्गातील जबाबदारी बदलल्याने नाराज; लक्ष्मण आयनोडकर यांचा ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा!

शेअर करा

३० वर्षांच्या पक्षनिष्ठेनंतर निर्णय; तालुकाप्रमुख संजय गवस यांच्यावर जातीय राजकारणाचा आरोप करत जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याकडे राजीनामा सुपूर्द!

दोडामार्ग, दि. २ नोव्हेंबर

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून गेली तीस वर्षे शिवसेना पक्षात काम केले. शिवसेना पक्षात फूट पडली तेव्हा कोणत्याही दबावाला बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. कामाची दखल घेऊन शिवसेना नेते अरुण दुधवडकर, माजी खासदार विनायक राऊत ,माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, यांनी जिल्हा उपप्रमुख जबाबदारी दिली. दोडामार्ग तालुक्यात काम करत असताना तालुका प्रमुख संजय गवस यांनी जातीय राजकारण करत आपल्याला उप संघटक म्हणून जबाबदारी टाकली हे आपल्याला मान्य नाही यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्याकडे पाठवला असे लक्ष्मण आयनोडकर यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण आयनोडकर यांनी सांगितले शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस यांनी आपली उप जिल्हा प्रमुख पदावरून एकदम
तालुका उप संघटक हा एक प्रकारे अन्याय आहे. तालुका प्रमुख जाणूनबुजून जातीय राजकारण करत आहे. तेव्हा आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. यापुढे एक शिवसैनिक म्हणून काम करणार असे सांगितले.

शेअर करा