Dodamarg News : तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद; दोडामार्गसह गोव्यातील बागायती धोक्यात!

शेअर करा

दुरुस्तीच्या कारणास्तव पाणीपुरवठा बंद; सुपारी, नारळ, केळीच्या बागांना फटका, गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर

दोडामार्ग, दि. २ नोव्हेंबर

महाराष्ट्र गोवा राज्य संयुक्त प्रकल्प असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा दुरुस्ती कारण देत बंद केल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या साटेली भेडशी, कुडासे, पणतुर्ली, भरपाल, सासोली तसेच गोवा राज्यातील हणखणे, हसापूर, चांदेल, गावातील सुपारी, नारळ, केळी, बागायती पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. काही जणांनी कालव्यातून पाणी उपसा करण्यासाठी कालव्यात बसवलेले मोटार पंप कोरडे पडले आहेत. या मुळे काही ठिकाणी गुरांच्या चारा समस्या निर्माण झाली आहे.

शेअर करा