Kankavli News : कणकवली गडनदीपात्रात बंधारे उभारण्यासाठी नियोजन

शेअर करा

तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडून जागेची पाहणी

कणकवली,दि.०२ नोव्हेंबर

एल निनोमुळे यंदा सिंधुदुर्ग जिल्ह््यात पावसामध्य घट झाली आहे. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत दहा हजार बंधारे उभारण्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असतानाच गडनदी नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी बंधारे उभारण्याचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातून वाहणाºया गडनदीपात्रात बंधारे उभारण्यासाठी सोमवारी रेल्वे पुलाशेजारील संभाव्य जागेची तहसीलदार दीक्षांत देशपांडे, न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पाहणी करण्यात आली.
कणकवली नगरपंचायत, महाराष्ट्र शासन, व्यापारी संघटना, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या माध्यमातून गडनदीपात्रात पाणी अडवण्यासाठी योग्य ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यात आली. नदीपात्रात कोणत्या ठिकाणी बंधारे उभारल्यास पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ, सचिव संदीप राणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रुपेश खाडये, विलास कोरगावकर, रोहन डिचोलकर, राजेश शिरवलकर आदी उपस्थित होते.

शेअर करा