रासायनिक विश्लेषण अहवाल प्रलंबित; जप्त मालाच्या वजनाबाबत निरीक्षण नोंदवत जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
देवगड तालुक्यातील कोटकामते येथे गांजा लागवड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात पोलिसांनी २.४५० किलो गांजासदृश माल जप्त केल्याचा दावा केला होता. मात्र, जप्त करण्यात आलेल्या मालाचा रासायनिक विश्लेषण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच जप्त मालाचे वजन करताना आवश्यक प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसल्याबाबतही युक्तिवाद करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या बाबींची नोंद घेत संशयित आरोपीस जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे प्रकरणात नव्याने चर्चा सुरू झाली असून पुढील तपास आणि रासायनिक विश्लेषण अहवालाकडे लक्ष लागले आहे.