नगरसेवक संतोष तारी यांच्या पाठपुराव्याला यश; १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती निधीची मागणी
देवगड,दि.१६ जून
देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील आनंदवाडी स्मशानभूमी नूतनीकरण कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कामासाठी नगरसेवक संतोष तारी यांनी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आज नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी व मोजणी केली.

संतोष तारी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील आनंदवाडी स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या या कामामुळे स्मशानभूमीची सुविधा अधिक सक्षम व सुस्थितीत होण्यास मदत होणार आहे.
आज प्रशासनाकडून करण्यात आलेल्या मोजणीमुळे या कामाच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे मानले जात असून, लवकरच निधी मंजुरी व पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या कामासाठी नगरसेवक संतोष तारी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आनंदवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, स्मशानभूमी नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे.
यावेळी नगरसेवक संतोष तारी आनंदवाडी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोयंडे,तात्या धुरी,हेमंत क़ुबल,संजय बाँदकर,गुरुनाथ तारी,गणेश क़ुबल,संतोष कोयंडे नगरपंचायत इंजीनियर विवेक खोत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.