ग्रामसभेत समितीच्या समाधानकारक कामकाजाची दखल; ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
देवगड,दि.३० ऑगस्ट
किंजवडे ग्रामपंचायतीची १५ ऑगस्ट रोजी तहकूब झालेली ग्रामसभा २७ ऑगस्ट रोजी सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी दिलीप कदम यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील वर्षभरात तंटामुक्त समितीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित न्यायाच्या सूत्रानुसार केलेल्या समाधानकारक व सातत्यपूर्ण कामकाजाची दखल घेत ग्रामसभेत पुन्हा एकदा दिलीप कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक राऊळ, तलाठी अमित झाडे, कृषिसेवक महेश सोनार, आरोग्य सेवक डॉ. कोरडे, माजी मुख्याध्यापक आनंद कदम, किरण टेंबुलकर, गिरीश चव्हाण, संजय आचरेकर, प्रमोद परब, दत्तात्रय किंजवडेकर, आशा सुर्वे, बबलू परब, प्रविण तेली, उपसरपंच विनय पाडावे, जयदास परब यांच्यासह सुमारे ९० ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलीप कदम यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.