देवगड : नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ

शेअर करा

माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते उद्घाटन; वैभव करगुटकर व संजय तारकर यांच्या पुढाकारातून आयोजन.

देवगड,दि. २२ जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या शिबिराचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर आणि माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आले होते.


यावेळी बोलताना माजी आमदार अजित गोगटे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांचे कौतुक केले. वाढदिवस साजरा करताना समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर आणि माजी नगरसेवक संजय तारकर यांनी खऱ्या अर्थाने समाजाचे देणे फेडण्याचा प्रयत्न केला असून, अशा उपक्रमांतून सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ मिळत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.


या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे, भाजपा तालुका अध्यक्ष राजा भूजबळ, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, सुभाष धुरी, हरिदास कांदळकर, मोहन शेटगे, संजय कावले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

शेअर करा