देवगड : मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

शेअर करा

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते तथा नगरसेवक शरद ठाकूरूल यांचा स्तुत्य उपक्रम; भटवाडी व बेलवाडी जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार साहित्य वितरण

देवगड,दि. २० जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते तथा नगरसेवक शरद ठाकूरूल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

हा उपक्रम मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून जिल्हा परिषद शाळा भटवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या हिताचा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने परिसरातील पालक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेअर करा