२१ जून रोजी महापुरुष पार, जगतापवाडी येथे आयोजन
देवगड, दि. २० जून
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून देवगड येथे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नगरसेविका प्रणाली माने व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महापुरुष पार, जगतापवाडी, देवगड येथे हा उपक्रम पार पडणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपयुक्त ठरेल असा हा लोकोपयोगी उपक्रम असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये मोफत छत्री वाटप हा उपक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नगरसेविका प्रणाली माने तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले असून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.