​देवगड : पत्रकार व छायाचित्रकार प्रज्वल गायकवाड इनामदार यांना राज्यस्तरीय ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ प्रदान!

शेअर करा

देवगड ,दि.१५ जून
ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२६’ सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड (बापर्डे) येथील प्रसिद्ध आदर्श पत्रकार आणि छायाचित्रकार . प्रज्वल विनोद गायकवाड इनामदार यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले.
​हा मानाचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सांगली जिल्हा) चे जिल्हाध्यक्ष. विवेक कोकरे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रज्वल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. पत्रकारिता आणि फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याची दखल घेऊन संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अशोक गोरड आणि कार्याध्यक्ष प्रा.. महादेव महानोर यांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती.
​या सोहळ्याला माजी दुग्धविकास कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक . प्रदीप गोरड यांसह राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. प्रज्वल गायकवाड यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच पत्रकारिता आणि छायाचित्रकार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा