देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छीमार बांधवांना मोठ्या छत्र्यांचे वाटप

शेअर करा

संतोष तारी यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रम; माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते शुभारंभ

देवगड,दि.२३ जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी तसेच नगरसेवक संतोष तारी यांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांसाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळा खडपे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका प्रणाली माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अजित गोगटे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ बॅनरबाजी न करता समाजाला प्रत्यक्ष उपयोगी पडतील असे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्याच विचारांचा आदर्श ठेवून नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी संतोष तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मच्छीमार बांधवांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविला असून हा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मच्छीमारांच्या दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणाऱ्या या साहित्यामुळे त्यांना निश्चितच मदत होणार असून, सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

शेअर करा