देवगड,दि.३० सप्टेंबर
मूळ देवगड तालुक्यातील वाडा येथील व सध्या कोल्हापूर येथे स्थायिक असलेल्या सौ. नयना नारायण बेळणेकर (७३) यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने २७ सप्टेंबर रोजी निधन झाले. स्वभावाने प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पार्थिवावर वाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. महसूल खात्यातील निवृत्त अधिकारी नारायण तथा नाना बेळणेकर यांच्या त्या पत्नी होत.