महिला उद्योजिकांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ; २४ व २५ ऑक्टोबरला इंद्रप्रस्थ हॉल येथे प्रदर्शन!
देवगड,दि.२३ ऑक्टोंबर
देवगड तालुका महिला व्यापारी संघाच्या वतीने देवगडमध्ये प्रथमच ‘आदिशक्ती प्रदर्शन व विक्री’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर आणि रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत डायमंड हॉटेलमागील इंद्रप्रस्थ हॉल येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महिला उद्योजिकांच्या कलागुणांना ओळख मिळावी आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या प्रदर्शनात शाकाहारी खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल, दिवाळी फराळ, पिठे, लोणची आदी घरगुती खाद्यपदार्थ, वस्त्रदालन, दागिने, आकाशकंदील व अन्य दिवाळी साहित्य तसेच विविध प्रकारच्या हस्तकला वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध होणार आहेत.
महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक उद्योगांना चालना देणे आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, ही या महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवगड तालुका महिला व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे. शाकाहारी खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल, दिवाळी फराळ, पिठे, लोणची आदी घरगुती खाद्यपदार्थ, वस्त्रदालन, दागिने, आकाशकंदील व अन्य दिवाळी साहित्य तसेच विविध प्रकारच्या हस्तकला वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध होणार आहेत.
महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक उद्योगांना चालना देणे आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, ही या महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवगड तालुका महिला व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.