देवगड : खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा उपक्रम

शेअर करा

देवगड,दि.१५ जून

शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दाभोळे केंद्र शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या तसेच विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दाभोळे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच नारायण राणे यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी सांगितले.


दाभोळे केंद्र शाळेत झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजा भूजबळ, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा अनभवणे, सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, पोलीस पाटील सानिका कदम, कायद्याचे अभ्यासक प्रदीप कदम, मनोहर लिमये, धोंडू घाडी, सौ. घाडी, सौ. बाणे, मुख्याध्यापक पाटील, सहायक शिक्षक चोपडे, दत्तात्रय घाडी, सौ. सुर्वे, सौ. पाटील, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग शेडगे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी पांडुरंग शेडगे यांनी केले.

शेअर करा