पोलीस अधिकाऱ्यांची शाळेला भेट; नव्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून दिल्या शुभेच्छा
देवगड,15 जून
15 जून 2026 रोजी शाळा प्रवेश पहिला दिवस 10.30 वा ते 11.50 वाजता चे दरम्याने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत स. पो. नि. सुप्रिया बंगडे व म पो. कॉ येडगे यांनी जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी येथे भेट देऊन शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या तसेच जुन्या विद्यार्थ्यांचे पुष्प व गोड खाऊ देऊन स्वागत करून त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. स्वागतोत्सव उपक्रमांतर्गत पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे पहिले पाऊल व मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले. सदर वेळी शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे 4 विद्यार्थी अंगणवाडी चे 5 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच 2 शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक, आनंदवाडी ग्रामस्थ ही उपस्थित होते. पालकांना जिल्हा परिषद शाळेचे महत्व पटवून देऊन जास्तीत जास्त मुलांना शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेण्याबद्दल मागदर्शन केले.