देवगड : देवगडहून संत सोपान काकांच्या पायी वारीसाठी विशेष बस व्यवस्था

शेअर करा

२० ते २२ जुलै दरम्यान वारकऱ्यांना पंढरपूर वारीत सहभागी होण्याची संधी; नोंदणीसाठी आवाहन

देवगड,दि.१५ जून

श्री संत सोपान काकांची पायी वारी येत्या ८ जुलै रोजी देवगड येथून प्रस्थान करणार आहे. संपूर्ण पायी वारीत सहभागी होणे अनेकांना शक्य होत नसल्याने, अशा भाविकांसाठी यावर्षीही विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. २० ते २२ जुलै या कालावधीत भाविकांना वारीचा आनंद घेता यावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


या विशेष वारीसाठी दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री ब्राह्मणदेव मंदिर येथून बस प्रस्थान करेल. दि. २० जुलै रोजी अकलूज येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यानंतर दि. २१ जुलै रोजी प्रत्यक्ष पायी वारीत सहभाग घेण्याची संधी मिळणार असून, दि. २२ जुलै रोजी चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यात येणार आहे.
दर्शनानंतर रात्री भोजन करून बस देवगडकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे. तसेच ज्यांना रिंगण सोहळा पाहायचा नसेल, त्यांना गावातील पायी वारीमध्ये सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.


प्रवासासाठी ४४ आसनी पुशबॅक बसची व्यवस्था करण्यात आली असून, प्रति व्यक्ती प्रवास खर्च १९०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. यापैकी २०० रुपये वारीतील अन्नदानासाठी देण्यात येणार आहेत. इतर वैयक्तिक खर्च भाविकांनी स्वतः करावयाचा आहे.
या वारीसाठी नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या भाविकांनी श्री. सूर्यकांत जोशी व श्री. मिलिंद कुबल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा