देवगड : मुणगेत अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात विशेष ग्रामसभा; ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

शेअर करा

भगवती मंदिरात विशेष ग्रामसभा; प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावर चर्चा करत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ग्रामस्थांची उपस्थिती.

देवगड ,दि. २२ जून
तालुक्यातील मुणगे गावामध्ये केंद्र सरकारकडून प्रस्तावित उभारण्यात येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाचे अनुषंगाने येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पला विरोध दर्शविण्यासाठी तसेच यावर विचारविनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्याच्या सोमवारी स. 11 वाजता सरपंच अंजली अशोक सावंत (प्रशासक) यांचे अध्यक्षतेखाली भगवती मंदिर मुणगे येथे खास विशेष ग्रामसभा आयोजित केली होते सदर सभेचे संपूर्ण सूत्रसंचालन योगेश प्रकाश सावंत यांनी केले. सदर सभेकरीता मिठबाव जि प गट सदस्य भाई पारकर तसेच मुणगे प सं गण सदस्य सदाशिव ओगले यांचे सह 200 ते 250 ग्रामस्थ उपस्थित होते.


या सभेत उपस्थित ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे प्रभागातील ग्रामपंचायतीकडून सदर प्रकल्पाला विरोध असल्याचे ठराव घेऊन त्याची प्रत मुणगे ग्रामपंचायतला देण्याबाबत विनंती केली. मुणगे आडबंडर गावाचे हद्दीत कोणीही जमीन विकत घेण्यासाठी बाहेरील व्यक्ती आल्यास अगर कोणत्याही कंपनीच्या सदस्य आल्यास त्यास जागेवरच विरोध करून ग्रामपंचायतीचे निदर्शनास आणून द्यावे असे ठरविण्यात आले. लवकरात लवकर कृती समिती स्थापन करून वरील अणुऊर्जा प्रकल्पास विरोध असल्याबाबतचे पत्र मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जि प सिंधुदुर्ग, मा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना पत्र देण्याबाबत ठरविण्यात आले

या आज झालेल्या ग्रामसभेचा ठराव दोन दिवसात तयार करून तो संबंधित अधिकारी यांना देण्याचं ठरविले. यापुढे कायदेशीर लढाई लढण्याची वेळ आल्यास मुंबई व गावातील ग्रामस्थांनी आर्थिक हातभार लावून सहकार्य करावे असे ठरविण्यात आले. आतापर्यंत मुंबई येथील ग्रामस्थांनी आर्थिक मदत दोन गोळा केलेले असल्याचे सभेसमोर सांगण्यात आले. सदर सभेमध्ये वरील विषय वगळून गावातील काही सार्वजनिक समस्या बद्दलही चर्चा करण्यात आली

शेअर करा