देवगड : मच्छीमारांसाठी शासकीय योजनांच्या विशेष मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ उत्साहात

शेअर करा

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, NFDP नोंदणी व विविध अनुदान योजनांची माहिती; मच्छीमारांना लाभ मिळवून देण्यावर भर


देवगड,दि. २१ जून

मच्छीमार बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध व्हावा तसेच मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन व नोंदणी शिबिराचा शुभारंभ भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.


या शिबिरामध्ये मच्छीमार बांधवांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) वर मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय अनुदान योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.


यावेळी मत्स्य व्यवसायाशी संबंधित शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मच्छीमारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. डिजिटल नोंदणी आणि योजनांची अचूक माहिती उपलब्ध झाल्यास मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असून मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीलाही गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या उपक्रमाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे,सभापती गणेश राणे,बाळ खडपे,तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ,प्रियंका साळसकर,महिला तालुकाध्यक्ष उषःकाल केळुस्कर,राजेंद्र वालकर,नगरसेवक बुवा तारी,संतोष तारी,रोहन खेडेकर,नगरसेविका प्रणाली माने,तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील,भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर, सुभाष धुरी,संजय तारकर,ज्ञानेश्वर खवळे,उल्हास मंचेकर,व्हीसी खडपकर,मिलिंद माने आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा