देवगड : नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे एसटी निवारा शेडचे लोकार्पण; विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

शेअर करा

देवगड,दि.२३ जून

देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिरगाव-तोरसोळे फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी निवारा शेडचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी श्रीफळ वाढवून केली. त्यानंतर शिरगाव जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शीतल तावडे तसेच सरपंच तेजस्विनी पवार यांच्या हस्ते फीत कापून एसटी निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल हवामानात सुरक्षित आसरा उपलब्ध व्हावा या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या निवारा शेडमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, राजेंद्र शेट्ये, संतोष फाटक, नंदू देसाई, मंगेश लोके, महेश पवार, वैभव साळसकर, सत्यवान भोगले, सुहास राणे, अरविंद पवार, ऋतुजा पवार, गायत्री पवार, रवींद्र पवार, दयानंद राणे, राकेश चौकेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या लोकोपयोगी उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, गावाच्या विकासासाठी अशा सुविधा उभारल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शिरगाव परिसरातील नागरिकांसाठी ही एसटी निवारा शेड भविष्यात मोठी सोय ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिली.

शेअर करा