शेठ म. ग. हायस्कूलचा उपक्रम; मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांच्या मार्गदर्शनाखाली नववीच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
देवगड,दि.०९ऑक्टोबर
देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जामसंडे येथे वनराई बंधारा बांधून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्ह्यात घोषित झालेल्या दुष्काळामुळे शासनाने जलसंधारणासाठी अनेक कृती कार्यक्रम आखलेले आहेत. त्यानुसार देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत पाण्याचे महत्व आणि बंधाऱ्यांचे महत्त्व ओळखून मुख्याध्यापक श्री. प्रवीण खडपकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंधारा बांधला. त्यामध्ये सहाय्यक शिक्षक श्री. सुरेश पवार, सहाय्यक शिक्षिका आफरीन पठाण इयत्ता नववीचे विद्यार्थी सहभागी झालेले होते.