दोडामार्ग : तिलारी घाटात अनोळखी महिलेचा सडलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

शेअर करा

वीज निर्मिती जलवाहिनी मार्गालगत झाडीत मृतदेह सापडला; घातपाताची शक्यता, दुर्गंधीमुळे घटना उघड

दोडामार्ग, दि. २९ मे 

गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या मार्ग असलेल्या तिलारी घाटात वरुन दोन किलोमीटर अंतरावर वीज निर्मिती जलवाहिनी कडे गेलेल्या रस्ता आड प्रेशर पाॅईट झाडी झुडपात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घातपात करून मृतदेह टाकला असावा अशी शक्यता काही जण या ठिकाणी गेले असता दुर्गंधी आल्याने घटना उघडकीस आली.
आडाळी कळसगादे पोलीस पाटील सदानंद विठू सुतार यांनी घटनेची माहिती चंदगड पोलीसांना दिली. तिलारी घाटात पंचनामा करून मृतदेह चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे नेला मृत महिलेची ओळख पटलेली नाही.
तिलारी घाटात या अगोदर देखील खुन करून दोन महिला तसेच चालक वाहक यांचे मृतदेह सांगाडे सापडले होते. हा घाट धोकादायक तसेच खोल दरी यामुळे गुन्हेगार घातपात करून मृतदेह या घाटात किंवा आड वाटेला टाकतात. या घाटाच्या वर चेक पोस्ट नाही यामुळे कर्नाटक तसेच इतर ठिकाणी घातपात करून मृतदेह तिलारी घाटात टाकणे सहज सोपे झाले आहे. शिवाय थांगपत्ता लागते नाही. हा मृतदेह दुर्गंधी आल्याने समोर आले.
तिलारी घाटात वीज निर्मिती करण्यासाठी जी पाईप लाईन आहे ती घाटात बोगदा खोदून आणली आहे येथे पाणी प्रेशर पाॅईट आहे.बाजुला झाडी झुडपे आहेत .त्या ठिकाणी एक रस्ता केला आहे सहजा कुणी फिरकत नाही पण काही प्रेमी युगुल या ठिकाणी येतात असेच कोणी या ठिकाणी गेले असता रस्ता बाजूला झाडीत सडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला यामुळे खळबळ उडाली आहे.
तिलारी घाटात महिलेचा मृतदेह आढळून आला हे समजताच चंदगड पोलीस उप निरीक्षक आकाश भिंगारदिवे ,
सर्व टीम तिलारी घाटात दाखल झाली. सदर महिलेचे वय ३० ते ३५ अंदाजे आहे. तिच्या अंगावर मोर पिसी सोनेरी साडी, लाल सोनेरी ब्लाऊज, तसेच पायात पैजण जोडे आहेत मृतदेह सडला आहे यामुळे ओळख पटणे कठीण झाले आहे. या ठिकाणी मृतदेह टाकला यामुळे घातपात शक्यता वर्तवली जात आहे. चंदगड पोलिसांकडून महिला कुठे बेपत्ता आहे का? याबाबत सर्वञ माहिती काढायला सुरुवात केली आहे.
तिलारी घाटात अनोळखी महिला घातपात शक्यता अधिक आहे पाच ते सहा दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असावा असा संशय आहे. चंदगड पोलिसांसमोर खुनाचा तपास करणे आवाहन आहे. कर्नाटक राज्यातील ही महिला असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू बाबत माहिती मिळणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटना स्थळी काही जणांनी गर्दी केली होती.

शेअर करा