नवीन इमारतीसाठी निधीची तरतूद नसल्याने जुन्याच इमारतींची दुरुस्ती; कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम
दोडामार्ग, दि. १२ आॅगस्ट
जवळपास चाळीस वर्षांपूर्वी तिलारी जलसंपदा विभाग कोनाळकट्टा येथे उभारण्यात आलेल्या शासकीय कार्यालये इमारती आज धोकादायक बनल्या आहेत. येथे काम करणारे कर्मचारी यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. शासन नियमानुसार धरणाच्या ठिकाणी नवीन इमारत बांधकाम करिता निधी मिळत नाही त्यामुळे जुन्या इमारती दुरुस्त केल्या जात आहेत. अशी माहिती जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी दिली.
तिलारी कोनाळकट्टा येथे तीन ते चार धोकादायक चार कार्यालय इमारती या जीर्ण झाल्या. दारे दरवाजे, खिडक्या, सिलिंग, वीज उपकरणे, निकामी झाली आहेत. खिडक्या खराब झाल्या यामुळे साप कार्यालयात येतात. यामुळे कर्मचारी काम करायला घाबरात
येथील शासकीय कार्यालयात जुने रेकॉर्ड कागदपत्रे आहेत. पण कार्यालये इमारती व्यवस्थित नाही यामुळे रेकॉर्ड कागदपत्रे खराब होऊ शकतात. यासाठी दरवाजे खिडक्या तसेच वीज उपकरणे इलेक्ट्रॉनिक काम करणे आवश्यक आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये सुरक्षा महत्वाची आहे हे गुहीत धरून येथील शासकीय कार्यालये इमारती दुरुस्ती काम सुरू केले आहे अशी माहिती तिलारी जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी दिली.