दोडामार्ग, दि. ३० मे
दोडामार्ग तालुक्यातील दोन पञकार माटणे येथे माती साठा वृत्त संकलन करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असलेले संशयित आरोपी नवनाथ विठ्ठल नाईक, विठ्ठल वासू नाईक या दोन जणांनी पञकार लवू दशरथ परब, त्याचे मिञ समीर ठाकूर यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मोबाईल देखील जमीनीवर आपटून फोडले होते. या बाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल झाला होता हे प्रकरण दोडामार्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी सुरू होती. फिर्यादी दोषारोप साबित करु शकले नाही त्यामुळे माटणे येथील पिता पुञ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली संशयित आरोपी यांच्या वतीने अॅड दाजी नाईक, अॅड, तनुजा वस्त यांनी काम पाहिले.
वरील पञकार माटणे येथे अवैध माती साठा वृत्त संकलन करण्यासाठी गेले असता संशयित आरोपी कडून धक्काबुक्की शिवीगाळ तसेच शेडमध्ये कोंडून ठेवले होते. या नंतर दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदर फिर्याद दोडामार्ग गुन्हा रजिस्टर २०/२००५ चा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५/(२) ३५२ ३५१,(२) (३) ३२४(४)
१२७(२) सह (५) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिस्सा आणि मालमत्तेचे नुकसान अश्वसनीय कलम ४,३,प्रमाणे नोंद झाला होता. चार्जशीट दोडामार्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केलेली होती. फिर्यादी पक्ष वाजवी संशयापलीकडे जावून आरोपी विरुद्धचा दोषारोप साबित करणेस फिर्यादी पक्ष अयशस्वी ठरला त्यामुळे आरोपींना या गोष्टीचा लाभ मिळुन बाप लेख निर्दोष मुक्तता झाली अॅड दाजी नाईक, अॅड तनुजा वस्त यांनी काम पाहिले.