दोडामार्ग:मोर्ले गावचे माजी सरपंच शिवसेना पदाधिकारी गोपाळ गवस यांचे निधन गावात शोककळा

शेअर करा

दोडामार्ग, दि. १ आॅक्टोबर

मोर्ले गावचे सरपंच तसेच शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली वेगळी ओळख तसेच डेसिंग नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे गोपाळ गवस यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता बांबोळी गोवा येथे उपचार दरम्यान निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते.
त्यांच्या निधनामुळे मोर्ले गावात शोककळा पसरली आहे.
गणेश चतुर्थी पूर्वी गोपाळ गवस याना हदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्याना तातडीने गोवा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या नंतर त्याना पुन्हा बांबोळी गोवा मेडिकल मध्ये दाखल केले होते. उपचार सुरू होते. पण गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी दु;ख व्यक्त केले आहे.
गोपाळ गवस नेहमीच समाजासाठी लढत राहिले हत्ती प्रश्न तसेच रस्ते विकास कामे यासाठी नेहमीच आवाज उठवला. सरपंच म्हणून मोर्ले गावात चांगले काम केले.

शेअर करा