दोडामार्ग आमसभेत राडा; विरोधकांवर हल्ल्याच्या प्रयत्नाने गोंधळ

शेअर करा

११ वर्षांनंतर झालेल्या आमसभेत शिवसेना पदाधिकारी आणि विरोधक आमनेसामने; पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

हत्ती नुकसान बाबत पंचनामा करायला वन कर्मचारी पैसे मागतात केला आरोप

दोडामार्ग, दि. १३ आॅगस्ट

दोडामार्ग तालुक्याची आमसभा अकरा वर्षानंतर गुरूवारी सकाळी घेण्यात आली. सभा सुरू झाल्यावर काही विरोधक सभा नियोजन बाबत विरोधकांना बैठक व्यवस्था संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा मतदार संघ उपाध्यक्ष रविकिरण गवस आमसभा अध्यक्ष दिपक केसरकर याना प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले असता या ठिकाणी उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी चक्क उठून हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामुळे आमसभा सुरुवातीला शिवसेना पदाधिकारी व विरोधकात राडा झाला या नंतर पोलिसांनी सर्वांना बाजूला केले. झालेल्या हल्याबाबाबत अखेर आम दिपक केसरकर यांनी दिलीगिरी व्यक्त केली. पण विरोधकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला.


दोडामार्ग तालुका आम सभा दिप प्रज्वलित करून तसेच राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गाऊन तसेच इशस्तवन व दिवंगत नेते मंडळी याना श्रध्दांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली.


आम दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आम सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस, श्वेता धर्णे, साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर, स्नेहा गवस, सोनिया नाईक, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मागच्या आमसभेत झालेल्या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी झालेल्या ठराव तसेच पूर्ण झालेली कामे याचा आढावा घेतला. जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी रविकिरण गवस यांनी काही मुद्दे बैठक व्यवस्था याबाबत सभा अध्यक्ष याना प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले असता


प्रश्न विचारला जात असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या पंधरा ते वीस शिवसेना शिंदे पदाधिकारी यांनी रविकिरण गवस वर हल्ला चढवला आणि सत्ताधारी शिवसेना विरोधकात चांगला राढा झाला. अखेर दोडामार्ग पोलीस निरीक्षक कर्मचारी यांनी सर्वाना बाजूला केले. यावेळी संतप्त झालेल्या विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला ही लोकशाही थट्टा आहे. प्रत्येक नागरिक याला जाब विचारणे अधिकारी आहे. असा हल्ला करणे हे सत्ताधारी यांचे अपयश आहे. असा आरोप विरोधकांनी केला. जवळपास पंधरा मिनिटे हा राडा गोंधळ सुरू होता.


राडा शांत झाल्यावर सभा पुन्हा सुरू झाली यावेळी काही जणांना गरम होत होते फॅन व्यवस्था नाही यावेळी गोंधळ झाला आपसात चर्चा वाढली तेव्हा ज्यांना गरम होते ते जावू शकतात असे दिपक केसरकर म्हणाले यावेळी विरोधकांनी आम्हाला जायला सांगता सभा लावली कशाला अशी विचारणा केली.


यावेळी आम दिपक केसरकर यांनी घडलेली घटना याबाबत दिलगिरी व्यक्त केली ही आमसभा पंचायत समिती यांनी लावली पाहिजे आम. लावत नाही तर तारीक देतात. सर्व सामान्य नागरिकांना कामे सुचवता यावी यासाठी आमसभा लावली जाते हे दिपक केसरकर यांनी पटवून दिले.


आम दिपक केसरकर यांनी यावेळी उपस्थित सर्व खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत नाहीत याचा आढावा घेतला. जर कोण आले नाहीत तर त्यांना नोटीस काढा अशा सूचना केल्या.

शेअर करा